छत्रपती शिवाजीमहाराज हे भारताच्या इतिहासातील गेल्या १५०० वर्षात समुद्रमार्गे स्वारी करणारे पहिले राजे आहेत. या देशातील लोकांनी, राजांनी जेंव्हा आरमाराचा विचारही केला नव्हता तेव्हा महाराजांनी आरमार बांधायला घेतले. दूरदृष्टी म्हणतात ती अशी. १६५७ महाराजांनी आरमार बांधणीकडे नियोजनपूर्वक लक्ष घातले. आणि त्या आरमाराची परीक्षा घेण्याचे महाराजांनी ठरविले. त्याचाच एक भाग म्हणून १६६४ च्या पावसाळ्यानंतर मराठ्यांचे गुप्तहेर पार बार्सिलोर पर्यंत जाळे टाकून आले.
महाराजांच्या आरमारातील काही जहाजे पार भटकळ बंदरापर्यंत निरीक्षणाच्या मोहिमेपर्यंत गेली होती आणि आता मोहिमेची पूर्ण तयारी झाली होती. याचकाळात मिर्झाराजा जयसिंग औरंगाबादेच्या पुढे आला होता. तो लवकरच पुण्याच्या दिशेने आपले लाखभर सैन्य घेऊन स्वराज्यात घुसणार होता.
अर्थात मोघलांची स्वराज्यावर स्वारी म्हणजे प्रचंड नासधूस आणि जाळपोळ. म्हणजे आता मोघलांच्या आक्रमणाला सामोरे जायचे म्हणजे आर्थिक उभारणी करणे ओघानेच आले. महाराजांची मोहिमेची जय्यत तयारी झाली होती. मिर्झाराजांनी त्यांच्या अक्कलहुशारी प्रमाणे डाव टाकला खरा परंतु त्यामुळे महाराजांचे काही बिघडले नाही. त्याने स्वराज्याच्या भूभागाची नाकेबंदी करणे हाती घेतले होते पण त्याने आरमार आणि किनारपट्टी हा विषय लक्षात घेतलं नाही.
आपल्या मोहिमेची वार्ता महाराजांनी गुप्त ठेवून इकडे मिर्झाराजाला बेसावधच ठेवला परंतु तिकडे सागरावरील शत्रूचा कानोसा घेणेही आवश्यक होते. पोर्तोगीज आणि इंग्रज हे दोन हुशार शत्रू संधी पाहून इकडे तिकडे उड्या मारणारे रंग बदलू सरडे होते. त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक होते. महाराज संधीची वाट पाहत होते आणि तशी परिस्थिती निर्माण झाली. ८ फेब्रुवारी फेब्रुवारी १६६५ ला पोर्तोगीजानी मुंबई हे बेट इंग्रजांना हुंड्यात आंदण म्हणून देण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमासाठी पोर्तोगीज सगळे आरमार घेऊन मुंबई ला आले होते आणि नेमके याच वेळी महाराजांनी आपले सुसज्ज आरमार मालवण सिंधुदुर्ग मधून बाहेर काढले.
कोकणातून गोव्याच्या बाजूला जायचे तर मध्य गोवा आणि तेथील पोर्तोगीज मध्ये येणार हे ठरलेले. म्हणून महाराजांनी त्यांना मुंबईकडे येऊ दिले आणि मग आपण आरमारासह त्या दिशेने निघाले. भारताच्या इतिहासातील या पहिल्या गनिमी काव्याच्या मोहिमेवर महाराजांसोबत सात हजार नौसैनिक, तीन गलबते आणि ८५ छोटी गलबते होती.
महाराज गोवा कारवार कुमठा होनावर भटकळ असा प्रवास करत गांगुली या बसनूर जवळील बंदरापाशी १३ फेब्रुवारीला १८५ सागरी मैलांचा प्रवास करून पोहचले. इथल्या खादीचे पात्र मुखापाशी अत्यंत चिंचोले असल्यामुळे महाराजांनी येथेच आपली गलबते थांबवली व भूमार्गाने ते बसनूर वर चालून गेले. बसनूर शहर सकाळी गुलाबी झोपेत असताना मराठे अचानक तेथे येऊन प्रकट झाले आणि हि बातमी कोणाला लागूच नये म्हणून महाराजांनी आपण मोगलांवर आक्रमण करण्यासाठी जुन्नर वर चाल करून जात आहोत अशी बतावणी केली होती. समुद्रमार्गे या शहरावर कोणी चाल करून येईल याची कोणी कल्पना देखील केली नव्हती

पहिली आरमारी मोहीम भाग १
Reviewed by aniket
on
March 27, 2018
Rating:
Reviewed by aniket
on
March 27, 2018
Rating:

No comments: